
मोटरसायकल डायरीज
पहिली मोटरसायकल हा हृदयाच्या कप्प्यात खास जागा असलेला विषय असतो. खूप कमी जण असतील जे पहिल्या फटफटीकडे निव्वळ एक वाहन म्हणून पाहू शकत असतील. पहिल्या मोटरसायकलशी (मग ती कोणत्याही मॉडेलची का असेना) खास भावनिक बंध नाही असं क्वचितच होत असेल. असं म्हणतात की माणसांवर प्रेम करावं आणि वस्तूंचा वापर करावा.. कधीही उलट करू नये. हे मला अगदी मान्य आहे. पण माणसांवर कितीही जीव लावला तरीही सगळ्याच वस्तूंकडे अगदी कोरड्या थंड मनाने उपयुक्ततेच्या नजरेने पाहणे कदाचित साक्षात गौतम बुद्धांनाही जमले नसावे. […]
Categories: मनातलं आभाळ, Travel