
दिल्लीची जामा मस्जिद
लाल किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आतच सतराव्या शतकात बांधली गेलेली सुप्रसिद्ध जामा मशीद (शुक्रवारी मशीद) म्हणजे शाहजहानाबादमधील एक महत्त्वाची वारसा वास्तू. दहा लाख रुपयात बांधल्या गेलेल्या या मशिदीची काही सुंदर चित्रे पुरातत्व विभागाकडे आहेत. कांद्याच्या आकाराचे तीन घुमट आणि निमुळते होत जाणारे जवळजवळ ४० मीटर उंच असलेले दोन मिनार हे जामा मशिदीचे वैशिष्ट्य. लाहोर येथे मुघल काळात बांधल्या गेलेल्या बादशाही मशिदीशी अनेक ठिकाणी आपल्याला साधर्म्य दिसते. जामा मशिदीचा नमाज पढण्याचा भाग जवळपास १०० स्क्वेयर मीटर क्षेत्रफळाचा असून उंच कमानीच्या दरवाज्यातून […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography • Tags: bukhara, bukhara imam, delhi, jama masjid, jami masjid, minaret, mughal, mughal architecture, shahjahan, shahjahanabad, taj ul masjid