Chinmaye

पुराना किल्ल्याची गोष्ट


35 Purana Bada darwaja

पुराना किल्ल्यात आपले स्वागत करतो तो बडा दरवाजा. त्यावर दिसतात झरोके आणि छत्री. दिल्लीच्या इतिहासातील सहावं शहर म्हणजे शेरगढ किंवा पुराना किला. असं म्हणतात की पांडवकालीन इंद्रप्रस्थ हे नगर या किल्ल्याच्या स्थानी होतं. शेरशहा सुरीने या किल्ल्याची निर्मिती केली ती हुमायून ने बनवलेल्या दीनपनाह शहराला नष्ट करून.

34 Purana Qila gate

Example of true arch

33 purana qila bada darwaja

Bada Darwaja from inside

 

old_1

१९१२-१३ च्या सुमारास जेव्हा या ठिकाणी उत्खनन झाले तेव्हा इंद्रपत नावाचे गाव इथे सापडले पुढे १९६० च्या दशकात झालेल्या उत्खननात ३००० BCE च्या सुमारासची भांडी इथं सापडली. मौर्यकालीन, सुंगकालीन, शक-कुशाण कालीन, गुप्त-कालीन, राजपूत आणि मग दिल्ली सुलतानच्या कारकिर्दीतील अवशेषही सापडले. इतकी जुनी पार्श्वभूमी या जागेला असल्यामुळे इंद्रप्रस्थच्या कथेत दम आहे असं अनेक लोक मानतात.

30 Purana Qila Qula-i-Kuhna

Qula-I-Kuhna Masjid

27 Purana Qila Qula-i-Kuhna25 Purana Qila Qula-i-Kuhna18 Purana Qila Qula-i-Kuhna15 Purana Qila Qula-i-Kuhna22 Purana Qila Qula-i-Kuhna23 Purana Qila Qula-i-Kuhna

19 Purana Qila Qula-i-Kuhna

Mihrab

 

32 Purana Qila Qula-i-Kuhna

Corner tower

या ठिकाणी अजूनही मजबूत अवस्थेत असलेली वास्तू म्हणजे किला-ई -कुहना मशीद. पाच कमानींचा दर्शनी भाग त्यातील मध्य कमानीच्या आजूबाजूला सुंदर कोरीव काम आणि वर घुमट अशी या मशिदीची रचना आहे. लोधी ते मुघल काळातील शैली-संक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसते. जमाली-कमाली मशीद आणि बडा गुम्बद मशीद यातून अनेक वैशिष्ट्ये या वास्तूत आली आहेत. या मशिदीची निर्मिती १५४१ CE ला शेरशहा सुरीने केली. ५१ मीटर बाय सुमारे १५ मीटरचे प्रार्थनागृह आणि कमळाच्या कळ्यांचे नक्षीकाम असलेल्या मेहराबी. मशिदीच्या इमारतीच्या कोपऱ्यात असलेले टॉवर हेही अजून एक विशेष.

13 Purana Qila sher mandal

Sher Mandal

शेरशहा सुरीने मनोरंजनासाठी बांधलेले अष्टकोनी व मध्यभागी छत्री असलेले शेर-मंडल ही पुराना किल्ल्याची ओळख म्हणता येईल. कोरलेल्या कमानी व प्लास्टरने काढलेली नक्षी याचे सौंदर्य वाढवते. हुमायून याचा पुस्तकालय म्हणून वापर करीत असे आणि इथूनच पडून त्याचा १५५६ CE साली मृत्यू झाला असं इतिहासकार मानतात.

14 Purana Qila hamamशेरमंडला समोर आहे हमाम. गरम-थंड पाण्याच्या तोट्या आणि वाफेच्या स्नानाची सोय असा इथला थाट. साधारणपणे सव्वातीन चौरस मीटर आकाराचा हा हमाम आहे.

12 Purana Qila baoli

दिल्लीत अनेक बावल्या आहेत … इथली विहीर ८९ पायऱ्या उतरून २२ मीटर खोल जाणारी आहे. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी खास रचना इथं केलेली दिसते.

11 Purana Qila humayuni

Humayuni Darwaja

10 Purana Qila humayuni

दक्षिण दिशेला हुमायूनी दरवाजा आहे. या दुमजली दरवाज्याची दुरुस्ती हुमायूनने केली असं म्हणतात. आज इथे लाईट आणि साउंड शोची जागा आहे.

9 Purana Qila talaqi

Talaqi Darwaja

8 Purana Qila talaqi

उत्तर टोकाला असलेला तलाकी दरवाजा दुमजली आणि वर छत्री असलेला आहे. या नावाचा शब्दश: अर्थ वापरायला बंदी असलेला असा होतो. हा दरवाजा वापरायला का बंदी होती हे स्पष्ट करु शकतील अशी साधने मात्र उपलब्ध नाहीत.

5 Purana Qila khairul
Khairul Manzil masjid
4 Purana Qila khairul madarasa

Madarasa

6 Purana Qila khairul madarasa

3 Purana Qila shershah gate

Sher Shah Gate

किल्ल्याशी संबंधित दोन वास्तू पाहायला आपल्याला किल्ल्याच्या मुख्य दारासमोरच्या रस्त्यापलीकडे जावं लागतं. सर्वप्रथम समोरच दिसते ती खैरुल मंजिल मशीद. मधल्या कमानीच्या दर्शनी भागावर कोरलेल्या लेखानुसार ही बांधली माहम अंगानी म्हणजे अकबराच्या दूध आईने. जर जोधा अकबर चित्रपट पाहिला असेल तर इला अरुणने हे पात्र रंगवलं आहे. मशिदीला लागून जे बांधकाम दिसते ते मदरशाचे आहे. तिथूनच पुढे गेल्यावर दिसतो शेरशहा दरवाजा किंवा लाल दरवाजा. पण सध्या त्याची डागडुजी सुरु असल्याने तो पर्यटकांना खुला नाही.

Purana_Qila_ramparts,_Delhi.jpg

Fort ramparts (wikimedia commons)

7 Purana Qila bastion

Jharokha and Chhatri

किल्ल्यासमोर एक छोटासा तलाव आहे तिथून तटबंदीचे सुंदर दृश्य दिसते आणि  बुरुजांवरच्या छत्र्या नीट दिसतात. पुढच्या वेळेला जाऊ दिल्लीच्या पाचव्या शहरात म्हणजे फिरोजशाह कोटला किल्ल्यात. मी क्रिकेट मॅचच्या प्रक्षेपणाचं काम करायला तिथं अनेकदा गेलो आहे पण ते मैदानात! किल्ल्याला भेट देणं बाकी आहे अजून! पुढच्या दिल्ली दौऱ्यात नक्की …

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: