Chinmaye

हवाई सफर – मुंबई ते अमृतसर


विलेपार्ले स्टेशन

टेक ऑफ पूर्वी पावसाची सर कोसळून गेली होती आणि आकाशातील ढगांची गर्दीही थोडी विखुरली होती. विमान उड्डाण करत पश्चिमेकडे झेपावले आणि विलेपार्ले रेल्वे स्टेशन चं विहंगम दृश्य दिसलं.

जुहू समुद्रकिनारा

हजारो प्रवाशांच्या गोंगाटाने भरलेली ती दुनिया विमानातून अगदीच शांत दिसत होती. स्टेशनात येणारी आणि बाहेर पडणारी लोकल ट्रेन … आणि स्वच्छ, पर्यटकांची गर्दी नसलेला जुहूचा किनारा.. विमान उजवीकडे म्हणजे उत्तरेच्या दिशेने वळलं आणि मग वर्सोवा किनाऱ्याजवळ, पोयसर नदीच्या मुखाशी मढ किल्ल्याच्या पश्चिम बाजूने वसईच्या दिशेने निघालं.

वर्सोवा बीच

पावसाळ्याच्या कृपेने सगळीकडे हिरवळीचे बगीचे पसरलेले दिसले. शेतकऱ्याच्या मेहनतीने बहरलेली शेती आणि आकाशातून दिसणारी गावे यांचं सौंदर्य आज अद्भुत भासत होतं. शेतांच्या मधून जाणारे रस्ते आणि गावातल्या घरांची दाटी चित्राला एक रेखीव साज देत होते.

पंजाब म्हणजे पाच नद्यांचा देश … सध्या उत्तर भारतात पावसाने जोर धरलेला असताना मोठ्या नद्या रौद्र रूपात वाहत आहेत. आधी दिसली ती सतलज नदी.

सतलज

चीन मध्ये उगम झालेली ही नदी भारतातून पाकिस्तानात जाते आणि सिंधू नदीला जाऊन मिळते. पंजाबच्या पाच नद्यांपैकी ही नदी सगळ्यात पूर्वेला आहे. जवळजवळ दीड हजार किलोमीटर लांबीचा प्रवास सतलज करते.

बियास

हिमालयात स्रोत असलेली पंजाब मधील आणखी एक महत्त्वाची नदी म्हणजे बियास. ही नदी ४७० किमी अंतर पार करून येते आणि सतलज नदीशी तिचा संगम होतो. बियास नदीचे प्रचंड मोठे पात्रही फ्लाईटमधून दिसले. पाण्याचा रंग पाहून असं वाटलं किती गाळ ही नदी प्रवाहाबरोबर आणून या सुपीक प्रदेशाला देत असेल.

अनेक ठिकाणी पाण्याचे कालवे दिसले आणि आजूबाजूला लोकवस्ती, शेती दिसत होती. त्यानंतर काही काळ ढगांच्या चादरीतून विमान पार झाले आणि ऊन-सावलीचा एक आगळा अनुभव घेता आला.

ढगांच्या दाटीला पार केल्यानंतर पुन्हा हिरवळ दिसायला लागली. ढगांचे तुरळक पुंजके त्यांच्या सावल्या आणि अथांग पसरलेली हिरवळ असा माहौल होता.

पंजाबच्या सुजलाम सुफलाम भूमीचे हे विमानातून घेतलेले दर्शन शाळेत असताना भूगोलात जे शिकलो त्याची आठवण करून देणारे होते. आता शेतीच्या बाबतीत इतर अनेक प्रदेशांनी प्रगती केली असली तरीही इथं या दृश्यात ते सगळं डोळ्यांसमोर सहज दिसत होतं.

अमृतसर प्रसिद्ध आहे सुवर्ण मंदिरासाठी .. शीखांचे हे महत्त्वाचे धार्मिक स्थान. भारताच्या सांस्कृतिक नकाशावर याला खास जागा आहे. अपेक्षेप्रमाणे फ्लाईट पाथच्या उत्तरेला म्हणजे उजव्या बाजूला हरमंदिर साहिब परिसराचा स्पष्ट वेध कॅमेरातून घेता आला आणि फ्लाईट सत्कारणी लागली.

सुवर्ण मंदिर

विमान उतरण्यापूर्वी अजून एका महत्त्वाच्या वास्तूचे दर्शन झाले ती म्हणजे गोबिंदगढ किल्ला. पूर्वी हा किल्ला आर्मीकडे होता पण आता तो पर्यटकांसाठी खुला आहे. तिथं संग्रहालय वगैरे आहे. या किल्ल्याची संपूर्ण रचना कशी आहे त्याचा अंदाज दीड हजार फुटावरून येत होता.

गोबिंदगढ किल्ला

अमृतसर शहर तसं दाटीवाटीने वसलेलं शहर आहे. रेल्वे स्टेशन परिसर लँडिंग आधी पाहता आला.

पावसाळा असूनही तुलनेने निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि यांना पूरक अशी विमानाची स्वच्छ खिडकी असा योग जुळून आला आणि अमृतसरची पहिली फ्लाईट फोटोंची पर्वणी ठरली. तर मित्रांनो जाताजाता हे सांगेन की तुम्हालाही जर हवाई फोटोंची आवड असेल तर नेहमीच्या प्रवासापूर्वी फ्लाईट रडार वर एकदा साधारण मार्ग पहा, नकाशात काय दिसू शकेल याचा अंदाज घ्या आणि मग तशी सीट वेब चेक इन मध्ये निवडून क्लिक करायला सज्ज व्हा.

One comment

  1. Shweta Karnik

    Khup Chan.. Chinmay tuzi photography ani tasech likhan..FB ver tuze post disale ki kadhi pahato Ani vachto ase vatate. Khup Chan mahiti lihitos tya photos baddal. tuzhya photos che ek chan pradarshan baghayla khupch avadel..keep it up.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: