Chinmaye

धुक्यात निजलेल्या सकाळी


wp-image-1410091573jpeg.jpeg

तुझ्या मिठीत सामावताना
मन चिंब भिजून जावं
धुक्यात निजलेल्या सकाळी
दवबिंदूत चांदणं रेंगाळावं … 1

तुझ्या डोळ्यातल्या आरशात
माझं हसू उमटावं
जणू विहिरीतल्या पाण्यावर
चित्र नभाचं व्हावं … 2

गालांवर ओठ ठेवतेस तेव्हा
फक्त त्या स्पर्शाला जपावं
जणू बागेतल्या सदाफुलीवर
फुलपाखरू अलगद बसावं … 3

तुझ्या केसांची दुलई घेऊन
डोळे मिटून राहावं
चुकून उघडले डोळे जर
हास्य तुझं गवसावं … 4

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: