
द्वंद्व प्रेमाचे
कवी शेखर, राजा विजयादित्याच्या दरबारात राजकवी होता. अमरपूर तसं छोटंसंच राज्य पण कलाकारांना आश्रय देणारं राज्य म्हणून ते प्रसिद्ध होतं. नदीकिनारी असलेल्या आपल्या घरात शेखर एकटाच राहत असे. आजूबाजूच्या प्रत्येकच गोष्टीत शेखरला काव्य दिसत असे. त्याच्या कविता अगदी साध्या, सोप्या … पण थेट हृदयाला भिडणाऱ्या असत. आपली नवनवीन काव्ये तो दरबारात सादर करायचा. जेव्हा तो काव्य सादर करण्यासाठी उभा राहत असे तेव्हा चिकाच्या पडद्याने झाकलेल्या सज्जात त्याला एक आकृती हालचाल करताना दिसत असे. सोन्याच्या पैंजणांची किणकिण त्याला ऐकू येत असे. […]
Categories: गनिमी कावा, Literary • Tags: dinanath dalal, shekhar, tagore, the victory