दोन्हीकडचे दुराग्रही
देव आहे की नाही मला ठाऊक नाही आणि मला व्यक्तिशः त्याच्या असण्या-नसण्याने फरक पडत नाही, म्हणजे व्याख्या करायची असेल तर मी अज्ञेयवादी आहे. देव नाहीच्च असं म्हणणारे निरीश्वरवादी आणि देव आहे म्हणणारे सश्रद्ध किंवा सेश्वरवादी. आस्तिक आणि नास्तिक हे शब्द मूलतः खूपच सरळधोपट आणि चुकीच्या पद्धतीने वापरले जातात.. आस्तिक म्हणजे वेदांचे शब्दप्रामाण्य आणि अपौरूषत्व मानणारा आणि तसे न मानणारा म्हणजे नास्तिक. बरेचदा संस्कृती म्हणजे सश्रद्ध असणे आणि धार्मिक कर्मकांड अशी अतिसुलभ समजूत असणारी मंडळी गल्लत करत असतात आणि तसं ते […]
Categories: Photography