कुठे हरवली माझी कविता
लिहीली होती कधी स्वप्नांच्या देशात
राहत असे पापण्यांच्या घरात
का विरघळली डोळ्यातल्या थेंबात … 1
कधी क्षितिजावर दिसतात माझेच शब्द
गुणगुणलो होतो कधी चांदरात
रेन ट्रीच्या बनात
का मोकळ्या आसमंतात … 2
कुठे गेली माझी धुळीतली पावले
कधी चाललो होतो साखरझोपेत
खुणावत मला टी रोजच्या रस्त्यात
आणि गायब व्हायची गवतात … 3
कुठे गेले माझे पंख
झेप घेतली होती कधी निळ्या नभात
कधी दूर अवकाशात
कधी मनातल्या आभाळात … 4
https://imahammadsharif.wordpress.com/2017/09/08/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%95/
Plz read then decide