खिडकीतून दिसणारं जग
किती खरं वाटत असतं
बसल्याजागी दुनियेची
करामत दाखवत असतं
गर्दी, गाड्या, ठेले ….
गजबजाटाने भरलेलं असतं
पण हरवलेल्या चेहऱ्यांना
बेमालूम झाकून असतं
बाहेरून दिसतात
फक्त खूप खिडक्या
सगळं आखीव-रेखीव दिसतं
पण कधीच जाणवत नाही
एकेक खिडकी एक जग असतं